ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! तिकीट तपासणीसाठी मध्य रेल्वेने सुरू केला नवा उपक्रम


मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणी सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेऱ्यांसह SBI YONO ॲपद्वारे प्रवाशांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी UPI/QR कोड पेमेंट सिस्टम सुरू करून नवीन तिकीट तपासणी उपक्रम सुरू केले  तसेच दि. ३मे २०२३ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर नवीन नूतनीकरण केलेल्या टीटीई रनिंग रूमचे उद्घाटन केले.

SBI YONO ॲपद्वारे UPI/QR कोड पेमेंट सिस्टम

SBI YONO ॲप प्रवाशांना UPI/QR कोड प्रणालीद्वारे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना पेमेंट करण्यास मदत करेल. जे रोख हाताळणी कमी करेल आणि डिजिटल इंडिया मिशनच्या जाहिरातीनुसार संरक्षित आणि सुरक्षित व्यवहार देखील प्रदान करेल.

बॉडी कॅमेरे

बॉडी कॅमेरे तिकीट तपासणी दरम्यान पारदर्शकता राखण्यास आणि गैरवर्तन आणि हिंसक कृत्ये रोखण्यास मदत करेल. या उपक्रमामुळे तिकीट तपासणी दरम्यान कोणतीही तफावत आढळून येण्यास विशेषत: तक्रारी आल्यास मदत होईल, उत्तरदायित्व वाढेल, व्यावसायिकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठतेच्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल.

टीटीई रनिंग रूमचे नूतनीकरण

टीटीई रनिंग रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यासह नवीन बेड, गाद्या, ब्लँकेट, ऊशी, पडदे, मच्छरदाणी प्रदान करण्यात आले आहे. हा रूम खुल्या व्यायामशाळेसह सुसज्ज असेल आणि टीसींना लवकरच अनुदानित जेवण दिले जाईल.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button