ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधी अनैसर्गिक संबंध नंतर किरकोळ वादातून तृतीय पंथीय मित्रासोबत भयानंक कांड


भीवडी: भिवंडी शहरातील लाहोटी कंपाउंड या कपडा मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या शुल्लक वादातून डोक्यात लादीचा प्रहार करून एका तृतीयपंथीय युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो असे हत्या झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर हत्या करणारा आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे घटना? तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो (रा. नविबास्ती) हा तृतीयपंथीय मागील कित्येक दिवसांपासून आपला मित्र मोहम्मद कामील जमील अन्सारी या सोबत लाहोटी कंपाउंड या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेऊन राहत होता.

 

काल रात्री त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने मोहम्मद कामील जमील अन्सारी याने त्याठिकाणी पडलेली वजनदार लादी उचलून तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो याच्या डोक्यात घातली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर असंख्य तृतीयपंथीय शहर पोलीस ठाण्याबाहेर एकत्रित येत त्यांनी आरोपीस अटक करण्याची मागणी लावून धरली.

शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी तात्काळ पोलिस पथकास आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी यास परिसरातून ताब्यात घेत त्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. भिवंडीत सहा महिन्याच्या बाळाचे अहरण भिवंडी शहरातून सोळा दिवसांपूर्वी एका सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची झारखंड येथे दोन लाख रुपयात विक्री केली होती. या गुन्ह्यातील त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी झारखंड येथून मोठ्या शिताफीने अटक करत चिमुकल्यास पुन्हा आईच्या कुशीत सोपवण्यात यश मिळवले आहे. आज पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी ही माहिती दिली आहे.
पोलीस पथकाने परिसरातील काही व्यक्तींकडून माहिती घेत सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे प्रथम भिवंडी शहरात फुटपाथ वर कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अफरोज अबुबकर शेख (वय 26 रा. शांतीनगर) यास ताब्यात घेत कसून तपास केला असता त्याने अपहरणाची कबुली देत बाळाला शंभु सोनाराम साव (वय 50 वर्षे रा. येवईनाका), भिवंडी या मार्फत विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करीत झारखंड येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शंभु सोनाराम साव यास कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली.

त्याच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला असता अपहरण केलेल्या मुलास झारखंड राज्यातील ओळखीची महिला मंजुदेवी महेश साव (वय 34 वर्षे) या महिलेस दोन लाख रुपयांना त्याची विक्री केल्याची कबुली दिली. ही माहिती मिळाल्यानंतर सहायवाक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक झारखंड राज्यात धडकले. महिलेचे वास्तव्य ठिकाण हे रांचीपासून दोनशे किमी अंतरावर नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने स्थानिक सशस्त्र पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील बाळाला विकत घेणारी महिला आरोपी मंजुदेवी महेश साव हिस बालकासह ताब्यात घेतले. त्यानंतर आज बाळाला पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सहा महिन्याचा चिमुकला अरबाज यास त्याच्या आई शहाना अन्सारी हिच्या कुशीत सोपविले आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button