मोठा दिलासा! 172 रुपयांनी स्वस्त झालं गॅस सिलिंडर
एकीकडे महागाई वाढत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे.
LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
देशातील 4 महानगरांमध्ये 171.50 रुपयांनी घसरण झाली आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहे. तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर नवीन किमतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आता दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर 2028 रुपयांऐवजी 1856.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात 2132 ऐवजी 1960.50 रुपयांना आणि मुंबईत 1980 ऐवजी 1808.50 रुपयांना मिळणार आहे.
चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी आता 2021.50 रुपयांना उपलब्ध होईल, तर आधी तो 2192.50 रुपयांना मिळत होता. पाटण्यात व्यावसायिक एलपीजीची किंमत रु. 2122 आहे. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी ९२ रुपयांनी स्वस्त झाला.
घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 1103 रुपये, मुंबईत 1112.5 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपयांना उपलब्ध आहे.
पाटण्यात घरगुती गॅसची किंमत प्रति सिलेंडर 1201 आहे. 1 मार्च 2023 रोजी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत बदल झाला. त्यानंतर तो 50 रुपयांनी स्वस्त करण्यात आला.