सस्पेंड केल्याच्या रागातून कॉलेजमध्ये घुसून चेअरमनवर गोळीबार
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/04/Screenshot_2023-04-29-14-16-15-93_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
बरेली : मागच्या काही काळापासून युपीत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील लोटस मॅनेजमेंज कॉलेजच्या चेअरमनला गोळ्या घातल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेने बरेली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केला जात आहे. कॉलेजमध्ये गैरवर्तन केल्यामुळे काढून टाकल्याचा राग मनात धरत थेट गोळ्या घातल्या आहेत. दरम्यान आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
लोटस मॅनेजमेंट कॉलेजच्या बी. फार्मच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या श्रेष्ठ सैनी या विद्यार्थ्याने कॉलेजचे चेअरमन अभिषेक अग्रवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर पाहून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अध्यक्षांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करत आरोपीस अटक केली. मात्र, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. याचबरोबर कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून चेअरमन यांच्यावर गोळी झाडल्याने नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केला.
फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते, मात्र खास खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी विद्यार्थी श्रेष्ठ सैनी आणि सक्षम सैनी यांना अटक केली. श्रेष्ठ याने त्याच्या मित्राकडून 2151 रुपये किमतीची बंदूक विकत घेतली. त्यानंतर कॉलेजमध्ये घुसून कॉलेजच्या चेअरमनला गोळ्या झाडल्या. सध्या दोन्ही मित्रांची चौकशी करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी बी फार्म करणार्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी श्रेष्ठ सैनीने गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला महाविद्यालयातून दंड ठोठावत काढून टाकण्यात आले होते. याचा राग मनात धरत महाविद्यालयाच्या अध्यक्षावर त्याने गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. त्याला अटक करून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.