ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनियुक्त पोलिस आयुक्त लोहियांनी घेतला पदभार


छत्रपती संभाजी नगर :शहरातील कायदा व सुव्यवस्था आणखी कडक करण्यावर भर देणार आहे, असे नवनियुक्त पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आयुक्त लोहिया म्हणाले की, लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प केला असून नागरिक, व्यापारी, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. शहर पोलिस आयुक्त पदाचा पदभार मनोज लोहिया यांनी गुरुवारी (ता.२७) मावळते आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. यावेळी शहराचे तिन्ही पोलिस उपायुक्त उपस्थित होते. राज्य शासनाने २४ एप्रिलरोजी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या बदलीचे आदेश काढले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार डॉ. गुप्ता यांना शहर पोलिसांतर्फे बुधवारी सायंकाळीच निरोप देण्यात आला होता.

डॉ. गुप्ता यांचीही पोलिस महासंचालक कार्यालयातील प्रशासन विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नेमणूक झाली आहे. गुरुवारी दुपारी मनोज लोहिया हे कुटुंबातील सदस्यांसह पोलिस आयुक्तालयात पोचले. त्याठिकाणी उपस्थित डॉ. गुप्ता यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, दीपक गिऱ्हे, शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरच्या प्रविणा यादव आणि आयुक्तांच्या वाचक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांची उपस्थिती होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button