मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
महिन्याभरातील डॉ. शिंदे यांचा सलग दुसरा कोल्हापूर दौरा आहे.
रंकाळा तलावास मंजूर केलेल्या 15कोटी अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी ते करणार आहेत.
रंकाळा तलाव येथे फौंटन वुईथ लाईट सिस्टीम बसविण्यासंदर्भात रंकाळा तलाव येथे जागेची पाहणी करणार आहेत.
यापूर्वीच्या दौऱ्यात शिंदे यांनी कोल्हापूर शहरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करण्याची ग्वाही दिली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
कुस्ती संकुल उभारणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी म्हटले होते.
पन्हाळा येथे छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या नावे मुलींसाठी मिलिटरी स्कूल,रंकाळा तलाव संवर्धन,कोल्हापूरचा इतिहास उलगडणारा लेझर लाईट शो, दर्जेदार रस्ते, जिल्ह्याचा पर्यटन विकास या सर्व विकासकामांसाठी राज्य सरकारकडून भरीव निधी मंजूर करून घेण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मागील दौऱ्यात त्यांना खराब रस्त्यांचा अनुभव आल्याने कोल्हापूर मनपाच्या मुख्य शहर अभियंत्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.