छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात ११ जवान शहीद; अनेक जण जखमी
छतिसगड: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला असून नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत.
या शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी जवान आहेत, तर एक चालक आहे.
स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दांतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. आज दंतेवाडा येथील अरनपूर भागात नक्षलवादी लपल्याची बातमी मिळाली होती. (Latest Marathi News)
या माहितीवरून दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी आयडीचा स्फोट केला.
गृहमंत्री अमित शहांची बघेल यांच्याशी चर्चा
याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्यात ११ DRG (जिल्हा राखीव रक्षक) जवान आणि एक ड्रायव्हर शहीद झाले आहे.