बारसू रिफायनरी वादात शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना मोलाचा सल्ला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी मुद्यावरुन घमासान सुरु आहे. प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
काय म्हणाले शरद पवार?
स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. सामंतांकडून बारसू रिफायनरीचा आढाला घेतला. कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. उद्याच्या बैठकीत तोडगा निघतो का ते पाहू. रिफायनरी आंदोलकांचे प्रश्न सोडले पाहिजेत.
चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला मी दिला आहे. बारसूतील रिफायनरी बाबत चर्चा करायला हवी. अशं पवार पत्रकार परिषदमध्ये म्हणाले.
उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी पोलीस बळाचा वापर झाल्यासंबंधीही बोलणं झालं. त्यावर त्यांनी आम्ही आता कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या फक्त जमिनीची तपासणी करत असून त्यासाठी लोक विरोध करत होते. पण आता त्यांचा विरोध नाही. लोकांना समजावून सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
आम्हाला हा प्रकल्प करायचा असल्याची सरकारची भूमिका आहे. पण आम्ही त्यांना घाई करु नका असं सांगितलं आहे. तेथील स्थानिक विरोधक आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहूया असं म्हटलं.
त्यावर सामंत यांनी उद्याच आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी बैठक घेतील. त्यातून येणारा निष्कर्ष सरकारला दिला जाईल. त्यानंतर जर आणखी काही प्रश्न असतील तर त्यावर चर्चा करत मार्ग काढू किंवा काही पर्याय आहे का त्यावर बोलू असा सल्ला मी दिला,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांना प्रकल्पावर त्यांची भूमिका काय असं विचारलं असता ते म्हणाले, “मी स्थानिकांशी चर्चा केलेली नाही. कोणताही प्रकल्प करताना स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं. त्यांचा विरोध असेल तर ते समजून घेत त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. कोकणात काही नवीन होत असेल आणि स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे’. दरम्यान माझ्या पक्षाचे काही सहकारी तिथे जाणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.