ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची अवस्था पाहून चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव; बीडच्या परळीतील प्रकार


बीड:जिल्ह्यातील परळीमध्ये एसटी चालक-वाहताच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. परभणीहून-लातूरकडे निघालेली बस बीडच्या परळी बसस्थानकात आल्यानंतर वयोवृद्ध महिला बसच्या सीटवरच बेशुद्ध पडली.
प्रवासी व वाहकाने हलवून उठवले तरी महिला उठत नसल्याने बसमधील इतर 40 प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बस थेट परळी उपजिल्हा रुग्णालयात आणत महिलेवर उपचार सुरू केले. लातूर आगाराचे चालक कावळे व वाहक पवार यांनी धाडस दाखवल्याने आज एका महिलेचे प्राण वाचले. या घटनेनंतर दोघांचेही कौतुक होत आहे. काय आहे प्रकरण? लातूर आगाराची बस (एमएच 24 एयू 7768) लातूर डेपोचे चालक अनिल कावळे व वाहक मनोज पवार हे रविवार 23 एप्रिल रोजी परभणीहून सकाळी 9.30 वाजता लातूरकडे निघाली होती. या बसमध्ये परभणीहून एक 60 वर्षीय महिला परळीपर्यंत येण्यासाठी बसली.

ही बस परळी बसस्थानकात आल्यानंतर महिला उतरण्याऐवजी जागेवरच बेशुद्ध पडली. शेजारील प्रवासी व वाहकांनी या महिलेस उतरण्यासाठी उठवले. परंतु, महिला बेशुद्ध असल्याने चालक, वाहकांनी बसमधील इतर 40 प्रवाशांना खाली उतरवत लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले व बस थेट परळी उपजिल्हा रुग्णालयात आणत महिलेवर उपचार सुरू केले. या महिलेजवळ असलेल्या कागदपत्रांवरून ओळख पटली व नातेवाइकांना बोलावून घेतले. ही महिला परळी शहरातील माणिकनगर येथील शकुंतला पुटावाड असल्याचे कळल्यानंतर नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या महिलेस रक्तदाबाचा त्रास होता व सकाळी औषधी गोळी घेतली नसल्याने बेशुद्ध पडल्याचे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाइकाला सांगितले. लातूर आगारातील चालक कावळे व वाहक पवार यांच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचल्याने उपस्थित नागरिकांनी दोघांचेही कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button