वैद्यकीय पर्यटनात भारताची उत्तुंग झेप
नवी दिल्ली:भारताला वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे आता सुखद परिणाम दिसून येत आहेत.
गेल्या वर्षी 14 लाख परदेशी पर्यटक केवळ वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री Shripad Naik श्रीपाद नाईक यांनी दिली. या रुग्णांबरोबरच त्यांचे नातेवाईकही येत असल्याने वैद्यकीय पर्यटनाबरोबरच कृषी व अन्य पर्यटनालाही चालना मिळत आहे. वैद्यकीय सुविधांबाबत भारताविषयी विश्वास जगात वाढत असल्यानेच विदेशातून मोठ्या सं’येने रुग्ण भारतात येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
Shripad Naik : भारतातील उपचारांचा अत्यंत कमी खर्च, उत्तम वैद्यकीय तंत्रे आणि उपकरणांची उपलब्धता यामुळे परदेशी रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यांना इथल्या भाषेच्या समस्येशी फारसा सामना करावा लागत नाही. कारण इंग्रजी बोलणारे भारतात सर्वत्र आढळतात. त्यामुळे परदेशातील रुग्णांसाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे रुग्ण भारतात आल्याने देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनही मिळते. जेव्हा एखादा विदेशी रुग्ण भारतात येतो तेव्हा त्याच्यासोबत दोन-तीन सहकारीही रुग्णाची काळजी घेण्यासाठी येतात. ते अनेक महिने हॉटेलमध्ये राहतात. हृदयविकार, अस्थिरोग, किडनी, यकृत प्रत्यारोपण, नेत्रविकार आणि जळलेल्या जखमांवर उपचारासाठी बहुतेक परदेशी रुग्ण भारतात येतात. जगभरात स्थायिक झालेले भारतीय वंशाचे लोकही आता भारतात उपचारासाठी येऊ लागले आहेत. दर महिन्याला अनेक परदेशी रुग्ण आमच्या येथे उपचारासाठी येतात, असे राजधानीतील अपोलो हॉस्पिटलशी संबंधित प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. अनुप धीर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भारतात उच्च पात्र वैद्यकीय व्यावसायिक आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत. शिवाय, आरोग्य सेवांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता भारतात अमेरिका व इंग्लंडपेक्षा कमी खर्च येतो. यामुळे युरोप व अन्य आशियाई देशांमधील रुग्ण देखील भारतात मोठ्या सं’येने येत आहेत.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.