पत्नीचा जाळून खून करणाऱ्या पतीस आजन्म कारावास
अकोला : पाहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शायना पाटील यांच्या न्यायालयात प्रकाश रामेश्वर क्षीरसागर (वय ४०, रा. कुंभारी) यास पत्नीच्या खुनाच्या आरोपात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रकाश याने त्याची पत्नी रुपाली हिला राहते घरी ता. ११ डिसेंबर २०१२ रोजी अन्य मित्रांच्या मदतीने घासलेट टाकून पेटून दिले होते. नंतर उपचारा दरम्यान तिचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतक हिच्या बहिणींनी पती प्रकाशवर संशय व्यक्त करून पोलिस स्टेशन सिव्हिल लाईन्स येथे फिर्याद दिली होती.
मृतक हीचे मृत्यूपूर्व जबानी व अन्य परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शिक्षा ठोठावली. मृतक हिचे लग्न घटनेच्या सहा महिने पूर्वीच प्रकाश क्षीरसागरसोबत झाले होते. तो तिला माहेरून मोटासायकल विकत घेण्याकरिता ३० हजार रुपये आण असे म्हणून तिला सतत त्रास देत असे. मृतक हिने तिच्या बहिणीकडे व भावाकडे या बाबत माहिती दिली होती. आरोपीनेच त्याच्या पत्नीला जाळल्यानंतर दवाखान्यात दाखल केले.
परंतु चूल पेटवताना घासलेट कॅनमधून सांडले व ती जळाली असे बायान देण्यास तिला बाध्य केले. नंतर मृतक हिचे नातेवाईक दवाखान्यात आल्यानंतर मृतक हिने हिम्मत करून सत्य घटना संगितली.
नंतर पुन्हा तिचे बायन कार्यकारी दंडाधिकारी यांनी नोंदवले व आरोपीने मृतक हिला मित्रांच्या मदतीने त्यांच्याच घरात घासलेट टाकून जाळल्याची खरी परीस्तीती समोर आली. परिस्थितीजन्य पुराव्याचे आधारे प्रकाश यास दोषी ठरवण्यात आले. परंतु अन्य आरोपी दिनेश गवई व किरण वानखडे यांच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले.