ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल रमेश बैस गुरुवारी नेवासा दौऱ्यावर


नेवासा: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे गुरुवार (दि.27) रोजी नेवासा तालुका दौऱ्यावर येणार असून श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त देवस्थानला भेट देवून पाहणी करणार असल्याची माहिती विश्‍वासनिय सुत्रांनी दैनिक ‘प्रभात’शी बोलतांना दिली.
राज्यपाल बैस हे मुळचे छत्तीसगढच्या राजपूरचे आहेत. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 सालचा असून ते 75 वर्षांचे आहेत.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

याआधी त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवलेले आहे. तर त्याआधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार त्यांनी सांभाळलेला आहे. ते भाजपचे सदस्य असून 1999 मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री होते. त्यांची राजकिय कारकिर्द नगरसेवक ते खासदार अशी झालेली असून एक गाढे अभ्यासक म्हणून राज्यपाल बैस यांच्याकडे पाहिले जाते.

तिर्थक्षेत्र नेवासा येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी पैस थांबाला टेकून ज्ञानेश्‍वरी या महान ग्रंथाला जन्म दिलेला असून देशात मंदिरासाठी ‘खांब’ उभारले जात असतांना नेवासा येथे ‘खांबा’साठी मंदिर उभारले गेले आहे. राज्यपाल बैस श्रीक्षेत्र देवगड येथील कार्यक्रमानंतर नेवासा येथे पैस खांबाला नतमस्तक होणार की, आपला दौरा आटोपून पुन्हा मुंबईकडे प्रयाण करणार? याबाबत नेवासकरांत राज्यपालांच्या दौऱ्यामुळे उत्सुकत्ता निर्माण झालेली आहेत. राज्यपाल पहिल्यांदा श्री क्षेत्र देवगड येथे येत असून त्या निमित्ताने जोरदार स्वागताची तयारी देवस्थान ट्रस्टकडून करण्यात येत आहे.

खासदार लोखंडे यांनी दिले निमंत्रण
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी श्रीक्षेत्र देवगड देवस्थानची महती राज्यपाल बैस यांना सांगितलेली असून स्वच्छ सुंदर व देवस्थानचा निसर्गरम्य परिसर असल्याची माहिती त्यांनी राज्यपालांना देवून दर्शन घेण्यासाठी आठ दिवसांपुर्वी येण्याचे निमंत्रण दिले होते. श्रीक्षेञ देवगड देवस्थानचे गुरुवर्य ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्याशी संवादही करुन दिलेला होता. खासदार लोखंडे यांच्या आग्रहास्तव राज्यपालांचा हा दौरा गुरुवारी निश्‍चित झाला.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button