ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्णतेची लाटेमुळे अंगणवाडी वेळात बदल


नाशिक:राज्यासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. अंगणवाड्यांचे कामकाज सकाळी ८ ते दुपार १२ वाजेपर्यंत राहील, तर बालकांना पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते सकाळी साडेदहा अशी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचेअधिकारी दीपक चाटे यांनी दिली. (Change in Anganwadi timings due to heat wave Instructions to take measures in wake of heatstroke in district Nashik News)

उष्माघाताचा फटका बालकांना बसू नये, यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाभरातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले आहेत. राज्यात उष्णतेची लाट तीव्र असून, सगळीकडे दुपारचे कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

अनेक जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याचे बघावयास मिळत आहे. आगामी काळात उष्णतेची लाट तीव्र होऊन उष्माघाताचा धोका वाढणार असल्याचे सांगितले जात जात आहे. या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याकरिता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तत्पर झाला असून जिल्हाभरातील ११३ प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आरोग्य विभागापाठोपाठ एकात्मिक बालविकास विभागानेही या परिस्थितीत अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या बालकांना त्रास होऊ नये, अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदललेल्या वेळेनुसार, बालकांना शिक्षण व पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते साडेदहा अशी निश्चित करण्यात आली आहे.

अमृत आहार अंतर्गत देण्यात येणारा चौरस आहार देखिल गरोदर व स्तनदा मातांना दुपारी १२ वाजेपुर्वी देण्यात यावा. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांची योजनांची कामे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत करावीत, असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी चाटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

उष्माघाताची लाट असल्यामुळे करावयाची कार्यवाही

१) बालकांना सकाळी ८ ते १२ वाजेपावेतो अंगणवाडी मध्ये उपस्थित ठेवावे.

२) अंगणवाडीमध्ये बालकांसाठी ओआरएस ठेवण्यात यावे.

३) बालकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावे.

४) अमृत आहार अंतर्गत देण्यात येणारा चौरस आहार देखिल गरोदर व स्तनदा मातांना दुपारी १२ वाजेपुर्वी देण्यात यावा.

५) अंगणवाडी केंद्रात CBE उपक्रमाकरिता माता बालके व पालक यांना दुपारी १२ वाजेपूर्वी उपस्थित ठेवावे

६) उष्माघातापासून बचाव करणा-या साधनांचा अंगणवाडी केंद्रात वापर करावा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button