चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
नागपूर : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोराडीत ही घटना घडली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये गोलू उर्फ हरिओम शिवदयाल सनोडिया (रा. बंडोल, मध्य प्रदेश) याचा समावेश आहे. पीडित मुलीचे वडील मध्य प्रदेशातील आहेत. कामाच्या शोधत पीडित मुलीचे आई-वडील नागपुरात आले. कोराडी परिसरात एका इमारतीचे काम करून झोपडीत राहतात. याच परिसरात गोलूही राहतो.
१५ एप्रिलला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गोलू हा मुलीला झोपडीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडत घरी आल्याने मुलीला काय झाले हे तिच्या आई-वडिलाला कळले नाही. तिला अधिकच त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरने तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.
आई-वडिलाने विचारणा केली. तेव्हा गोलूने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. वडिलांनी कोराडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूला अटक केली. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. लकडगंजमध्ये ५७ वर्षीय चौकीदाराने नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.