राजकीय

सुषमा अंधारेंचा ताफा अडवला, राऊतांच्या कारवर चप्पलफेक


मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाप्रबोधन यात्रेच्या सभेला जात असताना आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.



गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला केलं आणि मग सुषमा अंधारे सभेच्या ठिकाणी गेल्या.
जवळपास दोन ते तीन मिनिटं सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्यात आली. यानंतर पोलिसांनी गर्दी हटवली आणि सुषमा अंधारे यांचा ताफा पुढे गेला. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना नमस्कार करून आणि हसून सुषमा अंधारे कार्यक्रमाच्या स्थळी रवाना झाल्या.

 

सोलापुरात राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक
दुसरीकडे सोलापूरमध्ये संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला संजय राऊत आले होते, यानंतर तिथून रवाना होत असताना संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आली. चप्पलफेक करून कार्यकर्ते पसार झाले. कार्यकर्त्यांनी नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. हल्ला करणारा नारायण राणे यांचा कार्यकर्ता सागर शिंदे होता. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावरील वक्तव्य बंद करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र उत्तर देऊ, असा इशाराही सागर शिंदेने दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button