Video:पोलिसांचं महिलेशी गैरवर्तन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल,पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई
महिले सोबत गैरवर्तन करण्याची घटना अनेकदा ऐकली आहे. या साठी देशात कायदा बनवला आहे. आणि पोलिस महिलांची रक्षा करण्यास तयार आहे.सोशल मीडियावर दररोज कोणतीही घटना घडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गोष्टी जगाच्या समोर येतात. पोलिसांचं महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेहा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहे.
सदर घटना शांघायच्या सॉन्गजियांग जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्वीटरवर @FightHaven या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये एका महिलेचं जिच्या कडेवर लहान मूल आहे. पोलिसांसोबत रस्त्याच्या कडेला लावलेल्या कार पार्किंग वरून वाद सुरु असताना पोलीस या महिलेला शिवीगाळ करत आहे.महिला रागाच्या भरात येऊन पोलिसाला धक्का देते. या वागणुकीला संतापून पोलीस महिलेवर पलटवार करत धक्कादेत खाली जमिनीवर पाडतो. या प्रकरणात कडेवरील मुलगा देखील खाली पडतो.
Police Officers Body Slam a woman while she's holding a Baby… pic.twitter.com/ChBhLFEE6x
— Fight Haven (@FightHaven) April 9, 2023
ही संपूर्ण घटना स्थानिक लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे.ही घटना पाहून दोन स्थानिक लगचेच त्या महिला आणि मुलाच्या मदतीला धावतात. पोलीस कारमध्ये बसलेला दुसरा पोलीस अधिकारी लगचेच कारच्या बाहेर येतो आणि महिला उचलतो. महिलेला पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात बसवलं पोलिसांचं धक्कादायक कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतापले आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच निलंबन केलं आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !