क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडीलांना हाकलले घराबाहेर..


बहिणींना घरी का येऊ दिले, असे म्हणत बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून दिल्याचा प्रकार नगर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी घडला.



बीड : बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आ. संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
रवींद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी बहिणी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घरी आल्या . त्यावेळी आ. संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी, तुम्ही बहिणींना घरी का येऊ दिले, असे म्हणत माझी कॉलर धरून धक्काबुक्की केली. मला व बहिणींनाही हाकलून दिले. या तक्रारीवरून आ. संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button