बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम
बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल
https://t.co/YowfxWsJb9
बायकोने केला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग; अंतर्वस्त्रातील महिलेने ठोकली धूम— NAVGAN NEWS BEED (@beed_news) March 28, 2023
विवाह बाह्य संबंध जोडप्यांमध्ये गंभीर घरगुती मतभेद निर्माण करू शकतात. फसवणूक झालेल्या व्यक्तीला तिच्या/त्याच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळल्यानंतर मोठा धक्का बसतो.
फसवणूक झालेल्या व्यक्तीची भावना आणि कृतींवरील नियंत्रण सुटते. ती व्यक्ती हिंसक होऊ शकते किंवा बदला घेण्याच्या कृतीत स्वतःला तसेच त्यांच्या जीवन साथीदाराला आणि इतरांना इजा करू शकते.
बेवफाईमुळे घडलेल्या अशा गुन्ह्यांच्या बातम्या आपण नेहमी ऐकत किंवा पाहत असतो. योगायोगाने अशा घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद होतात. ज्यात फसवणूक करणारे त्यांच्या जीवनसाथीकडून रंगेहाथ पकडले जातात. नक्कीच, अशा घटनांचे परिणाम अत्यंत गंभीर असतात.
नुकताचं, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला एका मुलीचा पाठलाग करताना दिसत आहे, जी तिच्या घरातून अंतर्वस्त्रात पळून जाण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या पत्नीशी वाद घालत आहे. ती महिला त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभी असताना तिच्यावर ओरडत असल्याचे दिसते. दरम्यान, अंतर्वस्त्रातील एक मुलगी या दोघांपासून लपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मुलगी बाल्कनीच्या बाहेर अत्यंत धोकादायकपणे उभी आहे.
जोडप्यामधील वाद संपताच ही महिला बाहेर पडते. तर पुरुष तिला हात देऊन बाल्कनीतून घरात घेतो. ही महिला या पुरुषाची गर्लफ्रेंड असल्याचा प्राथमिक अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओतील पुरुषाची बायको घरातून भांडण करून निघून गेल्यानंतर ही महिला केवळ अंतर्वस्त्रावर घराबाहेर पडते. काही क्षणांनंतर, मुलगी प्रवेशद्वाराजवळ डोकावते आणि तिचे सामान धरून पळून जाते.
मात्र, घराजवळ उभा असलेला एका मुलगा या महिलेला पाहून आरडाओरडा करतो आणि पुरुषाच्या पत्नीला आवाज देतो. त्यानंतर, व्हिडिओतील पुरुषाची पत्नी आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा पाठलाग करते. व्हिडीओ कॅप्चर करणारा माणूसही त्यांच्या मागे लागतो आणि व्हिडिओ मध्यंतरी संपतो.
सध्या हा मजेशीर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.