पुरंदर भोर वेल्हा धार्मिक,ऍग्रो ,किल्ले टुरिझम पर्यटन उद्योग विकास परिषदेची स्थापना करावी – राजेंद्रजी कोंढरे
पुरंदर भोर वेल्हा धार्मिक,ऍग्रो ,किल्ले टुरिझम पर्यटन उद्योग विकास परिषद स्थापन करणे – राजेंद्रजी कोंढरे. राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ
पुरंदर : ( आशोक कुंभार ) पुरंदर भोर वेल्हे या तालुक्यात नव्वद अशी पर्यटन स्थळे आहेत त्या ठिकाणी या तीनही तालुक्यातून रोजगार निर्मिती व्यवसायाला चालना मिळू शकते,यामध्ये धार्मिक स्थळ पर्यटन व्यवसाय,किल्ले टूरिझम पर्यटन, ऍग्रो टुरिझम,अशा व्यवसायात आपल्याला उद्योग, निर्माण करून आपली अर्थव्यवस्था आपण मजबूत करू शकतो तसेच शेतकरी या व्यवसायात उतरले तर कोणताच शेतकरी आपली जमीन कवडीमोल भावात विकणार नाही असे विचार राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी जेजुरी येथे झालेल्या बैठकीत विचार व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र खंडोबा नगरीत राजेंद्र कोंढरे अध्यक्ष,गुलाबदादा गायकवाड राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप,पश्चिम विभाग उपाध्यक्ष राजेंद्र जगताप,सोनुकाका जगताप जिल्हा कोषाध्यक्ष, वाळके साहेब शाखा अध्यक्ष
गणेश मुळीक पुरंदर अध्यक्ष,संदीप जगताप सासवड शहर अध्यक्ष,बाबुराव गायकवाड कार्याध्यक्ष पुरंदर,जयेंद्र निकम,सलील महाराज जगताप,विशाल बारसुडे शाखा अध्यक्ष जेजुरी, मनोज बारसुडे,आकाश उबाळे, केतन उबाळे, स्वप्नील बारसुडे,विवेक उबाळे,सनी बारसुडे,बाळासो जरांडे,केतन उबाळे आदी उपस्थित होते
यावेळी पुरंदर तालुका,सासवड शहर,जेजुरी शहर,नीरा या शाखेचा आढावा घेण्यात आला