निवृत्त अधिकार्याचे घर भरदिवसा फोडले

बेळगाव:माळमारुती परिसरातील साई मंदिरजवळील वंटमुरी कॉलनीतील घर चोरट्यांनी दिवसा फोडले. घरातील 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या काही वस्तू व 65 हजारांची रोकड, असा 8 लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला . निवृत्त सरकारी अधिकारी इरय्या मोगय्या मठपती (रा. वंटमुरी कॉलनी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत माळमारुती पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इरय्या मठपती यांच्या मुलीचे चार दिवसांनी लग्न आहे. यासाठी त्यांनी दागिने घरी आणून ठेवले होते. त्यांच्या नातेवाईकाला बरे नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना पाहण्यासाठी ते रविवारी सकाळी 10 वाजता कुटुंबीयांसह हॉस्पिटलला गेले. 11.30 वाजता जेव्हा ते घरी परतले तेव्हा समोरील दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले. आत जाऊन पाहिले असता कपाटातील दागिने व रक्कम लांबवल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी माळमारुती पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक जगदीश हंचिनाळ तपास करत आहेत.