दिल्ली आता भाजपची, ‘झाडू’न आप बाहेर? एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आता पूर्ण झालं आहे. ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहे. पोल डायरी या संस्थेनं सर्वात धक्कादायक आकडे दिली आहे. दिल्लीत आता भाजप सरकार येईल असता अंदाज वर्तवला जात आहे. भाजपला 42 ते 50 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. तर आपला १८ ते २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला ० ते २ जागाच मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे.
matrize एक्झिट पोलमध्ये भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर
दिल्लीचे तख्त कोण राखणार? याकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडलं आहे. ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहे. तर matrize ने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर आहे. भाजपला ३५ ते ४० जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर आपला ३२ ते ३७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला एकच जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
मॅट्रीझचा एक्झिट पोल
भाजप- 35 ते 40
आप- 32 ते 37
काँग्रेस- 0 ते 1
चाणक्यचा एक्झिट पोल
भाजप- 39 ते 44
आप- 25 ते 28
काँग्रेस- 2 ते 3
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप- 42 ते 50
आप- 18 ते 25
काँग्रेस- 0 ते 2
पिपल्स पल्सचा एक्झिट पोल
भाजप- 51 ते 60
आप- 10 ते 19
काँग्रेस- 0
जेव्हीसीचा एक्झिट पोल
भाजप- 39 ते 45
आप- 22 ते 31
काँग्रेस- 0 ते 2
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा आप येईल का?
दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि आतिशी मुख्यमंत्री आहेत. २०१३, २०१५, २०२० मध्ये ‘आप’ सलग विजयी झाले आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. मात्र, मध्यंतरी केजरीवाल यांच्यावर अनेक आरोप झाले. दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलं आणि मार्च २०२४ मध्ये त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. सप्टेंबरमध्ये जेव्हा ते जामिनावर बाहेर आले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पक्षाने आतिशी यांना नवीन मुख्यमंत्री बनवलं.
‘आप’ आणि भाजपमध्ये टक्कर, तर काँग्रेसचं पुनरागमनाचा प्रयत्न
आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. तर भाजप आणि काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. १९९३ मध्ये भाजपनं दिल्लीत विजय मिळवला होता, पण त्यानंतर त्यांना कधीही विजय मिळवता आला नाही. त्यावेळी, १९९८, २००३, २००८ मध्ये काँग्रेसने सातत्याने विजय मिळवला आणि शीला दीक्षित मुख्यमंत्री राहिल्या. यावेळी निवडणुकीत ‘आप’ला भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार टक्कर मिळत आहे. दिल्लीत अंदाजे १.५६ कोटी मतदार आहेत. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ६ वाजता संपेल.
मागील दोन्ही निवडणुकीमध्ये किती फरक?
२०२० च्या निवडणुकीत ‘आप’ने ६२ जागा जिंकल्या आणि ५३.८० टक्के मतं मिळवली. तर भाजपने ८ जागा जिंकल्या आणि त्यांना ३८.७०% मतं मिळाली होती. २०१५ च्या निवडणुकीत ‘आप’नं ६७ जागा जिंकल्या आणि ५४.५० टक्के मतं मिळवली होती. भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या आणि त्यांना ३२.३० टक्के मते मिळाली होती.
दिल्लीतील टॉप फाईट
दिल्ली निवडणुकीत अनेक जागेवर चुरशीची लढत आहे. अरविंद केजरीवाल, आतिशी, परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत यांच्या सारखे प्रमुख नेते मैदानात आहेत. नवी दिल्लीची जागा सर्वात हाय-प्रोफाइल लढत ठरणार आहे. इथं आपचे नेते अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्यात स्पर्धा आहे.
पटपरगंज मतदारसंघात आपचे अवध ओझा, भाजपचे रविंदर सिंग नेगी आणि काँग्रेसचे अनिल चौधरी यांच्यात लढत आहे. वायव्य भागातील रोहिणी मतदारसंघात आपचे प्रदीप आणि भाजपचे विजेंद्र गुप्ता यांच्यात लढत आहे.
कालकाजी मतदारसंघात दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया, भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसचे फरहाद सुरी निवडणूक रिंगणात आहेत.