भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एका वर्षात एकदाच करता येणार अर्ज

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुबई, 28 फेब्रुवारी: भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. वर्षातून निघालेल्या प्रत्येक सैन्य भरतीमध्ये तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर आता तसं होणार नाहीये. कारण आर्मी भरतीसाठी तुम्ही वर्षातून एकदाच अर्ज करू शकाल. ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नेहमी सैन्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुण तरुणींसाठी ही बॅड न्यूज आहे. राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, ‘या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकतील.

जर तुम्हाला सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CEE सह रॅलीद्वारे सैन्यात नोकरी मिळवायची असेल, तर तुम्ही वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा फॉर्म भरू शकत नाही.  10वी पाससाठी थेट नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 248 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 16 फेब्रुवारीला फॉर्म आला. तुम्ही joinindianarmy.nic.in वर जाऊन 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

1-2 नव्हे तब्बल 652 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; मुंबई महापालिकेत 12वी पाससाठी मोठ्या भरतीची घोषणा राजस्थानचे उपमहासंचालक (भर्ती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, यावर्षी पहिली सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची रॅली आणि सैन्याची शारीरिक व वैद्यकीय चाचणी होईल. पूर्वी लेखी परीक्षा नंतर घेतली जायची. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पहिली शारीरिक परीक्षा घेण्यात आली. तब्बल 4200 केबिन क्रू अन् 900 पायलेट्ससाठी बंपर ओपनिंग्स; AIR INDIA मध्ये मोठ्या भरतीची घोषणा लष्कराच्या नवीन भरती प्रणालीमध्ये, पहिल्या टप्प्यात अग्निवीर भरती अधिसूचना, ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र जारी करणे, ऑनलाइन परीक्षा, लेखी परीक्षेचा निकाल आणि उत्तीर्ण झालेल्यांना रॅलीसाठी कॉल लेटर देणे यांचा समावेश आहे. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. ज्यामध्ये अग्निवीर शारीरिक परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करणे, उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि अंतिम गुणवत्ता (निवड यादी) तयार करायची आहे.