ट्रक्टर विहीरीत कोसळुन चालक गंभीर जखमी – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

लिंबागणेश येथे ट्रक्टर विहीरीत कोसळुन चालक गंभीर जखमी – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड तालुक्यातील मौजे. लिंबागणेश येथिल गणेशनगर वस्ती येथिल भाऊसाहेब वायभट यांच्या शेतामध्ये जेसीबी आणि ट्रक्टरने खरीप उचलुन बांध भरण्याचे काम सुरू असतानाच काल दि.२ मे सोमवार रोजी रात्री ८वाजता विहीरीचा अंदाज न आल्याने मागे घेताना ट्रक्टर ५ परस खोल विहीरीत कोसळले याचवेळी चालक अशोक अर्जुन गोंडे वय २५ वर्षे रा.लिंबागणेश ता.जि.बीड गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ बीडला हलवण्यात आले, बीड येथील लोटस हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर डोक्याला मार लागल्यामुळे शस्त्रक्रीया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.