प्लॉट घेण्यासाठी पत्नीचा छळ; पतीवर गुन्हा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चारचाकी गाडी तसेच प्लॉट घेण्यासाठी पत्नीचा छळ करीत मारहाण करणार्‍या पतीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे.
संदीप शिवाजी जगताप (रा.तपोनवन रोड, नगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. संदीप व पीडितेचा 2011 साली प्रेमविवाह झाला होता. संदीप याने लग्नानंतर दोन वर्षे व्यवस्थित संसार केला.

त्यानंतर 2013 पासून संदीपने दारु पिऊन पीडितेकडे वारंवार चारचाकी व प्लॉट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. पीडितेने त्याला 16 लाख रुपये दिले. त्यानंतर दारु पिण्यासाठी पैशांची मागणी तो करीत होता. मात्र, पैसे देत नसल्याने पीडितेला तो मारहाण करीत होता. बुधवारी (दि.22) पीडिता या कामावर जात असताना संदीप याने रस्त्यात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वीही पीडितेने संदीप विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. तसेच दिलासा सेलला देखील तक्रारी दिल्या होत्या.