क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र
देहूरोडमध्ये तरुणाला दांडक्याने मारहाण..

पिंपरी : ( आशोक कुंभार ) दुचाकी उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला दांडक्याने मारहाण केली. ही घटना देहूरोड येथे घडली. करण बलराज कागडा (रा. पारशीचाळ, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संदीप दिलबाग बोत (वय ३५, रा. पारशीचाळ, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घरात असताना त्यांचा लहान भाऊ राहुल दुचाकीवरून घरी आला. घराशेजारी दुचाकी उभी करून घरात येत असताना दुचाकी लावण्यावरून आरोपीशी वाद झाला. त्यामध्ये राहुल यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.