येळकोट येळकोटच्या गजराने परिसर दुमदुमला, भाविकांनी केली भंडाऱ्याची उधळण

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सोमवती अमावस्या… सोन्याची जेजुरी… यळकोट यळकोटचा जयघोष… भंडाऱ्याची उधळण… जेजुरी गडावर सोमवती यात्रा

पुणे : ( आशोक कुंभार ) अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजूरीच्या खंडोबा गडावर आज सोमवती यात्रा भरली आहे. सोमवती अमावस्येनिमित्त सोमवारी सकाळी 7 वाजता जेजूरी गडावरून कऱ्हा स्नानासाठी पालखी मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करून भंडाऱ्याची उधळण केली.

सोमवती यात्रेसाठी जेजूरी गडावर जवळपास 2 लाख भाविक दाखल झाले आहेत. देवस्थान व श्री खंडोबा पालखी समितीच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोन्याची जेजूरी

भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण जेजूरीगड न्हाऊन निघाला.जेजूरी गडाला यामुळे सोन्याची झळाळी आली होती. लाखो भाविकांनी ‘येळकोट येळकोट’चा जयघोष केला. करोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच भाविक एवढ्या मोठ्या संख्येने खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झाले हाेते.रात्री 2 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

सोमवती यात्रा
दरवर्षी सोमवती अमावस्येला जेजूरी गडावर यात्रा भरते. या सोहळयामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. वर्षभरात गडावर अनेक उत्सव व यात्रा होत असतात. सोमवती यात्रेत उत्सवमूतीँना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले जाते. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने भंडाऱ्याची उधळण करत पालखी सोहळयात सहभागी होतात . खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असतात.

देशभरात भाविकांची गर्दी

सोमवती अमावस्या हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते वंशजांना आशीर्वाद देतात, असे म्हणले जाते.

पुणे जिल्हा पुरंदर तालुका जेजुरी या ठिकाणी आज सोमवारी अमावस्या आल्यामुळे तेथील अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं त्या अमावस्येच्या निमित्ताने मुंबईवरून कोळी समाज फार मोठा येत असतो करा बाईचं स्नान करून आल्यानंतर जेजुरी येथील जानुबाई या देवीच्या मंदिरामध्ये खंडोबांचे आगमन होऊन दोन ते अडीच तास विश्रांती घेतली जाते