दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात 53 नागरिकांचा मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दमास्कस : जेव्हा नागरिकांवर हल्ला झाला तेव्हा पीडित वाळवंटातील ट्रफल्स गोळा करत होते. राज्य माध्यमांनी या हल्ल्याला जिहादी दहशतवादी गट इस्लामिक स्टेटला जबाबदार धरलंय. मात्र, या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.

होम्सच्या पूर्वेकडील अल-सोखना शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 53 लोक मारले गेल्याचं वृत्त सरकारी वृत्त वाहिनीनं दिलंय. पालमायरा रुग्णालयाचे संचालक वालिद ऑडी (Walid Audi) यांनी सांगितलं की, ‘मृतांमध्ये 46 नागरिक आणि सात सैनिकांचा समावेश आहे. यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सनं शुक्रवारी या हल्ल्याची माहिती दिली.