क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

तरुणींचे अनैतिक संबंध. बाळांनाही जन्म. त्यानंतर बाळांची विक्री पोलिसही चक्रावले


नागपूर : अनैतिक संबंध ठेवत त्यापासून होणाऱ्या बाळाची निपुत्रिक दाम्पत्याला विक्री करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे पैशांसाठी तरुणी हा सर्व प्रकार करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.



याप्रकरणी पोलिसांनी काही दलालांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवजात बाळाची विक्री करण्याचे मुख्य केंद्र म्हणून उपराजधानीची ओळख निर्माण झाली होती. नागपुरात नवजात बाळांची विक्री करणाऱ्या काही टोळ्या सक्रिय झाल्या. महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळाचा सौदा नागपुरातून होत होता. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेत मानवी तस्करी प्रतिबंधक पथक (एएचटीयू) स्थापन केले होते. राज्यात बाळ विक्री करणाच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपी नागपूर गुन्हे शाखेने अटक केले आहेत.

आयेशा ऊर्फ श्वेता खान, राजश्री सेन, रिटा प्रजापती, फरजाना अन्सारी, सीमा परवीन, सलाउल्ला खान, तोतया डॉ. विलास भोयर, पिंकी लेंडे, मोना, मकबुल खान या दलालांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या टोळ्याचे संबंध थेट गुजरात, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळपर्यंत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाळ विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले होते. त्यातूनच अविवाहित तरुणी अवैध संबंध ठेवून गर्भधारणा करीत असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

पैशांसाठी अवैध संबंधातून जन्मलेल्या बाळांची विक्री दलालांच्या टोळ्यामार्फत धनाढ्य दाम्पत्यांना करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही अविवाहित तरुणी स्वच्छेने बाळविक्रीसाठी गर्भवती होण्याचा निर्णय घेतात तर काही तरुणी नाईलाजाने बाळ विक्रीच्या व्यवसायात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.

पहिला गुन्हा नागपुरात
नवजात बाळ विक्री केल्याचे राज्यातील पहिले प्रकरण नागपूर गुन्हे शाखेच्या ‘एएचटीयू’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर नवजात बाळ विक्री करणाऱ्या सहा टोळय़ांना बेडय़ा ठोकून जवळपास ११ बाळांची विक्री झाल्याचे समोर आले होते. बाळ खरेदी-विक्री केल्याचे ११ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत तब्बल ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विक्री केलेल्या काही बाळांचा शोधही पोलिसांनी घेतला आहे.

‘एएचटीयू’ पथकची स्थापना
नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नागपूर पोलीस प्रयत्न करीत आहेत. बाळ विक्री करणाऱ्या काही टोळ्याना पोलिसांनी अटक केली आहे. असे प्रकार होऊ नये म्हणून ‘एएचटीयू’ पथकाची स्थापना केली आहे, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button