आमदार सुरेश धस यांच्याकडे बौद्ध दलित बांधवांनी निवेदनाद्वारे केली एकमुखी मागणी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आमदार सुरेश धस यांच्याकडे बौद्ध दलित बांधवांनी निवेदनाद्वारे केली एकमुखी मागणी
धानोरा येथील बौद्ध दलित स्मशान भूमीस वॉल कंपाऊंड व बौद्ध विहार बांधून द्या…!

आष्टी / बीड ( प्रतिनिधी – गोरख मोरे ) : बीड / उस्मानाबाद / लातूर विधान परिषद सदस्य आमदार सुरेश ( अण्णा ) धस यांनी गाव भेट दौरा प्रसंगी धानोरा येथील मंदिरात धानोरा भागातील अनेक शेतकरी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करीन असा विश्वास या प्रसंगी आमदार सुरेश धस यांनी दिला .
याप्रसंगी धानोरा येथील बौद्ध दलित स्मशान भूमीस वॉल कंपाऊंड व बौद्ध विहार बांधून देण्याचे एक मुखी मागणीचे निवेदन माजी उपसरपंच विठ्ठल मोरे , माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव आढागळे , विलास मोरे सर , डॉक्टर देवीदास मोरे या सर्वांनी या प्रसंगी आमदार सुरेश ( अण्णा ) धस यांना दिले .
याप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राव चव्हाण , राजाभाऊ शेळके , भगवान गायकवाड , संतोष शेळके , आजिनाथ शेळके , खालील सय्यद , दादासाहेब चव्हाण ,( ग्रामपंचायत सदस्य ) , परमेश्वर गायकवाड सह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी अनेक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची ग्वाही आमदार सुरेश ( अण्णा ) धस यांनी दिली .