ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

पैठण ‘ये दारू,पी दारू’ म्हणत राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये अजितदादांनी भुमरेंना फटकारलं


पैठण : पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, दोन सहकारी कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, एमआयडीसी, दोन महाविद्यालय हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिले.अरे मग भुमऱ्यांनी काय दिलं, ये दारू, पि दारू, काय चाललंय, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. यावेळी भुमरे यांच्या मतदासंघात अजितदादांची सभा पार पडली. यावेळी अजितदादांनी भुमरे यांनी दारूची दुकानं उघडली, असं म्हणत जोरदार टीका केली.

साखर कारखाने हिसकावून घेतले मग चालवण्यात दम का नाही. तुमच्या इथं पाणी आहे, पण तुमच्या लोकप्रतिनिधीच्या अंगात पाणी नाही. तुम्हाला वाईट वाटत असेल, अजित पवार विरोधी पक्षनेता आला आणि आमच्याच लोकप्रतिनिधीवर टीका टिप्पणी करतोय, जे खरं आहे तेच सांगतो, जर चुकीचे बोलत असेल तर कुणी सांगावं मागे घ्या, तर मी मागे घेतो, असं आव्हानच अजित दादांनी उपस्थितीत मेळाव्यातील लोकांना केलं

पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, दोन सहकारी कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, एमआयडीसी, दोन महाविद्यालय हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिले.

अरे मग भुमऱ्यांनी काय दिलं, ये दारू, पि दारू, काय चाललंय. आता कुठे तरी नीट विचार केलं पाहिजे. पाच वर्ष अशी निघून जातात. शेतकऱ्याचं पिक जर उद्ध्वस्त झालं तर 3 वर्ष पिक येत नाही, त्यामुळे एक आमदार निवडला तर मतदारसंघाचं वाटोळं होतं, अशी टीकाही अजित पवारांनी केली.

‘मी काहीच केले नाही हा आरोप भुमरे म्हणतात. अरे पुरुषार्थ दाखवा. ज्या जनतेने निवडून दिले त्यांना सोडून दिले वाऱ्यावर आणि तुम्ही दारूचे दुकान उघडत सुटला. एकनाथ महाराजांना काय वाटत असेल.

तरुण पिढीला दारूची सवय लावून संसाराची राख रांगोळी करत आहे. 9 दारुची दुकानं लावली आहे. दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर लावली, गाडी थांबावी, त्याने पाहावं आणि टाकून जावं, शाळेसमोर स्पीड ब्रेकर लावली जातात, अरे कुठे फेडायला ही पाप, असा टोलाही अजितदादांनी भुमरेंना लगावला.

‘राज्यात झालेली गद्दारी लोकांना पटलेली नाही म्हणून शिक्षक पदवीधरमध्ये लोकांनी मतामधून दाखवलं.

त्यामुळे निवडणुका घेण्याचे टाळत आहेत. 40 जणांना वाय प्लस दिली आहे.. महिन्याला एकावर 20 लाख रुपये खर्च होत आहे आणि इतर लोकांवर हल्ले होत आहे जनतेचे स्वरक्षण कोण करणार, आदित्य ठाकरे प्रज्ञा सातव हल्ले झाले पत्रकाराला जिवंत मारण्यात आले कायदा सुरक्षा कुठे आहे? अशी टीकाही अजित पवारांनी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button