स्वस्त धान्य दुकान म्हणजे लुटारुंचे आड्डे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

स्वस्त धान्य दुकानदार हे कोणत्याच नियमांचे पालन करताना दिसत नाहीत , दुकाण हे महीन्यातून मोजकेच दिवस चालू असते , ओरीजनल पावती दिली जात नाही , जास्तीचे पैसे आकारले जातात , धान्य कमी दिले जाते , लाभार्थी यांची पीळवणूक केली जाते , भ्रष्ट्राचाराची मोठी चैण असल्यामुळे तक्रारदारांची दखल शक्यतो कोठेही घेतली जात नाही

स्वस्त धान्य दुकानदार अरेरावीची भाषा वापरून शासन नियमाप्रमाणे धान्य देत नसल्याने तहसीलदार यांच्याकडे देविनिमगाव ग्रामस्थांची लेखी तक्रारा

आष्टी : मौजे देवीनिमगाव येथे सेवा सहकारी सोसायटीमार्फत स्वस्त धान्य वितरण करण्यात येते. सदरील स्वस्त धान्य दुकान हे प्रल्हाद मुरलीधर मडके हे चालवत आहेत. श्री. मडके हे शिधापत्रिकाधारकांना अरेरावीची भाषा वापरत असून शासन नियमाप्रमाणे धान्य देण्यास टाळाटाळ करतात. तसेच शासनाच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणारे मोफत धान्य त्यांनी लाभार्थीना वितरीत केलेले नाही.स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिल्यानंतर पावतीवरील वजनाप्रमाणे धान्य भरत नाही. याची तक्रार संबंधित दुकानदाराकडे केल्यानंतर माझे तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यापर्यंत हात असून तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, अशी दमदाटीची भाषा वापरतो. महिन्याभरात अवघे तीन दिवस सदरील दुकान उघडे ठेवण्यात येत असून इतर दिवशी धान्य आणण्यासाठी गेल्यानंतर तुमचे धान्य माघारी गेले, अशी उडवाउडवीची उत्तरे लाभार्थींना देण्यात येतात सदरील दुकानदारावर कडक कारवाई करून आम्हाला तातडीने पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या दुकानदारामार्फत धान्य वितरण करण्यात यावे. असे आष्टी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात देविनिमगाव येथिल शिधा पत्रिका धारक यांनी म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति जिल्हा अधिकारी बीड व जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांना देण्यात आल्या आहेत