अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. कमला हॅरिसचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.
ट्विट करून त्यांनी याबाबद माहिती दिली आहे. कॅलीफोर्नियावरून परतल्यावर हॅरीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना कोरोनाची लागण झाल्यानंतर व्हाईट हाऊसमध्येही चिंता वाढली आहे.

ट्विट करत कमला हॅरिस म्हणाल्या की, माझी कोरोना चाचणी झाली, ज्यामध्ये माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणे नाहीत आणि मी CDC मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. हॅरिस या पुढील काही दिवस घरातून काम पाहणार असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. हॅरीस यांचे दोन्ही डोस जानेवारी महिन्यात पूर्ण झाले. त्यांनी पहिला बूस्टर ऑक्टोबर महिन्यात आणि दुसरा बूस्टर डोस एप्रिल महिन्यात घेतला आहे.व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार कमला हॅरिस गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती यांच्या संपर्कात नव्हत्या. त्यामुळे काळजी घेण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच हॅरीस ज्यांना भेटल्या त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.