रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका कार्यकारिणी जाहीर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

तळागाळातील समाजापर्यंत न्याय देण्याचे काम करणार – कैलास जोगदंड

बीड जिल्ह्यातील तळागाळातील गोरगरीब समाजापर्यंत रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून अडी अडचणी व न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संघटक कैलास जोगदंड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आष्टी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पार्टीची आष्टी तालुका व शहर कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व पक्षाचे प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे रविवारी जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यातील निवड झालेल्या कार्यकारिणी मध्ये पागूळघव्हाण येथील दिलीप थोरात यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर वनवेवाडी येथील हनुमंत बनसोडे यांची तालुका उपाध्यक्षपदी तर आष्टी शहराध्यक्षपदी विनोद निकाळजे यांची तसेच वाकी येथील सागर ससाणे यांची तालुका सचिवपदी,राहुल ससाणे यांची तालुका संघटकपदी,डोईठाण येथील दादा खंडागळे यांची तालुका सरचिटणीसपदी,दिपक जोगदंड यांची तालुका कार्यध्यक्षपदी, आष्टी शहर उपाध्यक्षपदी अजय निकाळजे या सर्वांची निवड प‌क्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास नितिन निकाळजे, संदेश निकाळजे, अमोल थोरात, प्रशांत खंडागळे, नितिन जोगदंड,संदिप जोगदंड, प्रमोद जोगदंड, विनोद लोंढे,जिगर ससाणे, महादेव लोंढे,जालीदर घाडगे,आकाश पडागळे, दादासाहेब सावंत, युवराज अबिलढगे आदी वाकी आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.