क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

राष्ट्रध्वज उलटा फडकला! जत तालुक्यातील शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल


जत तालुक्यातील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज उलटा फडकविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची उमदी पोलिसात फिर्याद संजयकुमार विठ्ठल माळी यांनी दिली आहे.

सांगली ( जत ) : याबाबत अधिक माहिती अशी, बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास सुरू होता. सदरच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज हा वरती केसरी रंगाच्या ऐवजी हिरवा रंग अशी बांधणी शिक्षक प्रभाकर सलगर यांनी केली होती. याबाबत सलगर यांना माहिती असणे गरजेचे होते. दरम्यान, सदर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी राहणार बालगाव हे पुढे गेले.
राष्ट्रध्वज उलटा फडकला : त्यावेळी राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परीषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर हे पुढे आले. त्यांनी दुंडाप्पा कोटी यांनी झेंडा फडकविण्याची दोरी हातात दिली व दुसरी दोरी त्यांच्या हातात धरून उभारले त्यांनंतर राष्ट्रध्वज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वर असणे गरजेचे असताना तो खाली व हिरवा रंग वर अशा स्थितीत सदरचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवहेलना झाली आहे.

राष्ट्रध्वजाच्या अपमान : तरी सदरचा राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परीषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर हे जिल्हा परीषद शिक्षक असुन त्यांनी राष्ट्रध्वज फडकविण्या विषयीचे ज्ञान असताना देखील त्यांनी सदरचा राष्ट्रध्वज हा भगवा रंग वर पाहीजे असताना खाली करून वर हिरवा रंग असा बाधून तो गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी यांचे हस्ते फडकविणेत आला आहे. राष्ट्रध्वजाच्या अपमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button