नेकनूर ग्रामिण रूग्णालयात महीलेची छेडछाड करणारे डॉ.अशोक बांगर हे सीईओ अजीत पवार यांचे जावाई आहेत का ? – अँड संगीता धसे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नेकनूर ग्रामिण रूग्णालयात महीलेची छेडछाड करणारे डॉ.अशोक बांगर हे सीईओ अजीत पवार यांचे जावाई आहेत का ? – अँड संगीता धसे

बीड : नेकनूर ग्रामिण रूग्णालयातील आयुष कार्यक्रम विभागात कार्यरत असणारे डॉ .अशोक बांगर यांनी महिलेची छेडछाड केल्या प्रकरणी त्यांच्या गैर वर्तणुकीबद्दल त्यांचे विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिति महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर, भाजपा बीड तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर व त्यांचे सहकारी तसेच अँड संगिता धसे, संजीवनी राउत यांनी जिल्हारूग्णालयासमोर आंदोलन करुन डॉ.अशोक बांगर यांच्या निलंबनाची मागणी केली होती त्या बाबत जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना निवेदन देण्यात आले होते,त्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती,त्यात डाॅ.अशोक बांगर दोषीसिद्ध झाले होते, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे सदर तक्रार चौकशीसाठी गेली असता त्यांनी सदर डॉ. अशोक बांगर यांचे गैरकृत्यावर पांघरून घालून गुन्हेगाराला पाठीशी घालून निलंबना ऐवजी अभय देउन कोणतीही त्यात बदलीची तरतुद नसताना बदली करून आंदोलकांना बदलीचे चॉकलेट दिले
काय…..? गुन्हेगाराला पाठीशी घालणे, त्याला अभय देणे त्यामूळे गुन्हेगारी वाढेल की संपुष्टात येईल याचा सारासार वरीष्ठ अधिकर्‍यानी करणे आवश्यक होते…. तसे न झाल्यामूळे आपण वरीष्ठ अधिकारी असून सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेण्या ऐवजी आपण गुन्हेगाराची पाठराखण करता त्यामूळे ते आपले जावई आहेत काय?असा प्रश्न उपस्थित झाला, कामाच्या ठिकाणी महीला सुरक्षित राहतील का ? असा प्रश्न अँड संगिता धसे यांनी उपस्थित केला आहे