Video : मुख्यमंत्री अन् अमित शाहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

भोगीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पंतग उडवण्याची परंपरा आहे.
संक्रांतीला तीळगुळ वाटण्याबरोबरच पंतग उडवण्याचीदेखील परंपरा आहे.

महाराष्ट्रातही संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय गुजरातमध्ये संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्याची परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या भाईजानलादेखील येथील पतंगोत्सवाची भूरळ पडली होती.

सलमान खानने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला होता.. त्यानंतर यंदाच्या उत्सवात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातमध्ये पंतग उडवण्याचा आनंद लुटला.

या व्हिडिओमध्ये भूपेंद्र पटेल अतिशय अचूक पद्धतीने पतंग उडवत असल्याचे दिसून येत आहे. तर त्यांच्या बाजूला असलेली व्यक्ती हातात चक्री धरून ढिल देताना दिसत आहे.