ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

आज भारतात असतो तर…; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर ‘आर पार जोड दो, कारगिल को खोल दो’…


पाकव्याप्त काश्मीरच्या उत्तरेकडील गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलने करत आहेत.
आम्हाला भारताच्या केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये विलिन करावे अशी मागणी ते करत आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. लोकांना खायला अन्न नाहीय. धान्य मिळतेय पण ते एवढे महाग की घेऊ शकत नाहीत. पाकिस्तान सरकारही भेदभावाने वागत आहे. अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्याशी भेदभाव केला आणि त्यांच्या भूभागाचे शोषण केले, असा आरोप तेथील लोकांनी केला आहे.

PoK join India पाकव्याप्त काश्मीर (पीओके), गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) शेजारील देश पाकिस्तानमध्ये पीठ आणि खाद्यपदार्थांच्या संकटाच्या बातम्यांदरम्यान पुन्हा चर्चेत आहे.

अनेक दशकांपासून या प्रदेशाचे शोषण करणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणांवर तेथील रहिवाशांचा राग आहे. हे लोक आता लडाखमध्ये त्यांचा प्रदेश पुन्हा भारताशी जोडण्याची मागणी करत आहेत. इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये या भागातील लोकांमध्ये असंतोष दिसून येतो. भारतात जाण्याची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

कारगिल रस्ता पुन्हा सुरू करण्याची आणि लडाखच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशात कारगिल जिल्ह्याचे पुन्हा एकत्रीकरण करण्याची मागणी करत गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये एक विशाल रॅली दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये लोक ‘आर पार जोड दो, कारगिल को खोल दो’ PoK join India अशा घोषणा देत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू आहे. गहू आणि इतर अन्नपदार्थांवरील अनुदान पुनर्संचयित करणे, लोडशेडिंग, बेकायदेशीर जमिनीवर कब्जा आणि या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचे शोषण असे विविध मुद्दे स्थानिक लोक मांडत आहेत.

‘आर पार जोड दो, कारगिल को खोल दो’…https://t.co/050whAhEph

— Tarun Bharat Nagpur (@tarunbharatngp) January 13, 2023
पाकिस्तानी लष्कर गिलगिट-बाल्टिस्तान PoK join India भागातील जमीन आणि संसाधनांवर जबरदस्तीने दावा करत आहे. आंदोलक लोक पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचाही विरोध करत आहेत. अलीकडच्या काळात पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. महागाईच्या काळात जनता गॅसचे संकट, वीज संकट आणि अन्न संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानातील लोकांना जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button