ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

एका दिवसात हार्ट अ‍ॅटॅकनं तब्बल 21 मृत्यू, महत्त्वाचं कारण


कानपूर : हिवाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही हवेमध्ये म्हणावा तसा गारवा नव्हता.
मात्र, आता हवेतील गारवा प्रचंड वाढला आहे. विशेषत: उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुकं जास्त त्रासदायक ठरत आहे. कडाक्याची थंडी इतकी जीवघेणी ठरत आहे की, कानपूर शहरात एकाच दिवसात 21 जणांचा हार्ट अ‍ॅटॅक आणि ब्रेन स्ट्रोकनं मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (5 जानेवारी) कानपूरमध्ये हार्ट अ‍ॅटॅकनं 19 आणि ब्रेन स्ट्रोकमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय 625 रुग्ण हृदयाशी संबंधित तक्रारी घेऊन कानपूरमधील हृदयरोग तज्ज्ञांकडे आले आहेत. द वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल सर्कुलेशन’मध्ये थंडी आणि हार्ट डिसीजेसबाबत एक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनातील माहितीनुसार, अत्यंत थंड हवामानामुळे हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू होण्याचा धोका 37 टक्क्यांनी वाढतो. याउलट अत्यंत उष्ण वातावरण हृदयासाठी कमी घातक असतं.

अत्यंत उष्ण वातावरणामध्ये हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू होण्याचा धोका 12 टक्के आहे. अति तापमानाचा हृदयाशी संबंधित विकारांवर काय परिणाम होऊ शकतो हे तपासण्यासाठी संशोधकांनी 1979 ते 2019 या कालावधीत पाच खंडांतील 27 देशांमधील 567 शहरांत झालेल्या 32 दशलक्षांहून कार्डिओव्हॅस्क्युलर मृत्यूच्या डेटाचं विश्लेषण केलं आहे. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की, उष्ण वातावरणाच्या तुलनेत थंड वातावरणामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर मृत्यू जास्त होतात. ट्रेडमिलमधल्या तांत्रिक त्रुटी लपवणं पडलं महागात; `या` कंपनीला 154 कोटी रुपयांचा दंडतापमानात घट झाल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ अमेरिकेतील संशोधकांच्या संशोधनाला उत्तर प्रदेशमधील सध्याच्या स्थितीमुळे दुजोरा मिळत आहे.

उत्तर प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे हार्ट डिसीज आणि ब्रेन स्ट्रोकची प्रकरणं वाढली आहेत. शुक्रवारी कानपूरमधील कार्डिऑलॉजी इन्स्टिट्युटच्या ओपीडीमध्ये हार्ट डिसीजेसनं त्रस्त असलेले 547 रुग्ण आणि आयसीयूमध्ये 78 रुग्ण आले होते. यापैकी 46 रुग्णांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. आलेल्या रुग्णांपैकी आठ जाणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच 10 रुग्णांचा मृत्यू झाला.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, विविध प्रकारचे हृदयरोग हे युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील मृत्यूचं प्रमुख कारण आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमधील संशोधकांना असं आढळलं आहे की, थंडी आणि उन्हाळ्यात कार्डिओव्हॅस्क्युलर मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे. यापैकी थंडीमध्ये सर्वांत जास्त मृत्यू झाले आहेत. कार्डिओव्हॅस्क्युलर मृत्यूच्या कारणांमध्ये स्ट्रोक, अर्थेमिया (हृदयाच्या ठोक्यांतील अनियमितता), इस्चेमिक हार्ट डिसीज (अरुंद धमन्या) आणि हार्ट फेल्युअर (जेव्हा हृदय आवश्यक प्रमाणात रक्ताभिसरण करू शकत नाही) यांचा समावेश होतो.

एकंदरीत, कार्डिओव्हॅस्क्युलर कारणांमुळे होणाऱ्या एक हजार मृत्यूंमागे, जास्त थंडीमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या नऊने वाढते तर अतिउष्णतेमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या दोनने वाढते. हार्ट अ‍ॅटॅकबद्दल बोलायचं झाल्यास, हार्ट अ‍ॅटॅकमुळे थंडीच्या दिवसांत सुमारे 13 अतिरिक्त मृत्यू होतात तर अत्यंत उष्ण दिवसांमध्ये तीन मृत्यू होतात. हिवाळ्यात हृदय विकारांचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करा हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. थंडीत हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतो.

रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या हॉवर्ड मेडिकल जर्नलमधील एका संशोधनात असं निदर्शनासं आलं आहे की, तापमान कमी झाल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो. हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी पोटॅशियमयुक्त फळं आणि भाज्या अधिक प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. यामुळे शरीराला फायबरदेखील मिळतं.

परिणामी कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात जास्त कार्डिओ व्यायाम करू नये. जेवण सामान्य असावं. हिवाळ्यात जास्त चरबीयुक्त अन्न खाऊ नये. थोडीशी अस्वस्थता जाणवल्यास लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. क्लायमेट चेंजमुळे उन्हाळा अधिक उष्ण आणि हिवाळा अधिक थंड होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन संशोधकांनी रुग्ण, डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांना संभाव्य आरोग्य धोक्यांबद्दल अधिक जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button