ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

अजित पवार यांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का?


सिंधुदुर्ग : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड करुन राजकीय भूकंप केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का?
असा प्रश्न विचारला जात आहे. याला कारण आहे शिंदे गटाकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेले वक्तव्य. अजित पवार यांची राष्ट्रवादीमध्ये (NCP) घुसमट होत आहे, असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. दीपक केसरकरांच्या (Deepak Kesarkar ) दाव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.दीपकर केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, दादा आमच्या सगळ्यांसोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीमध्ये त्यांची घुसमट होतेय हे सगळ्यांनी बघितलंच आहे. एखादा उमदा नेता येत असेल तर कोणाला आवडणार नाही, असे केसरकर म्हणाले.

भाजपचे आमदार प्रवीण पोटे (BJP MLA Praveen Pote) यांनी अजित पवार यांच्याबाबत एक विधान केलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. दादा तुमची वेळ थोडी चुकली, सकाळऐवजी दुपारी झालं असतं तर तुम्ही आज महारष्ट्राचे मुख्यमंत्री असता, असे प्रवीण पोटे म्हणाले होते.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन
(Jayant Patil Suspension) झाल्यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar)
यांनी अजित पवार यांना फोन करुन माहिती घेतली.
निलंबनाच्या मुद्यावरुन शरद पवार अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
या प्रकरावरुन अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेयला पाहिजे होती.
मात्र त्यांनी सभागृहात माफी मागितली होती. यावरुन शरद पवार हे नाराज असल्याचे बोललं जात आहे.

अजित पवार यांनी मात्र शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
एवढच नाही तर त्यांनी या मुद्यावरुन मीडियावर संताप व्यक्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button