ताज्या बातम्यामहत्वाचेराजकीय

महापरिनिर्वाण दिन:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल दहा महत्त्वाच्या गोष्टी.


Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत.इतकच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाविषयीच्या दहा गोष्टी जाणून घेऊया.

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाबासाहेबांना एकूण 13 भावंडे होती. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ सुभेदार होते.

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांचे गुरू आणि शिक्षकांनी प्रेमाने त्यांचे आडनाव बदलून ‘आंबेडकर’ ठेवले.

3. वयाच्या 15 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाई यांच्यासोबत झाला.

 

4. दलित समाजातील त्याकाळी मॅट्रिक पास होणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच विद्यार्थी ठरले. त्याचबरोबर परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे ते पहिले भारतीय होते.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्राचार्यपद भूषवले.

6. अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा विचार न केल्याने आंबेडकरांना संविधान जाळायचे होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे कलम 370 मसुदा तयार करण्यास नकार दिला. कारण त्यांना तो मसुदा भेदभाव करणारा आणि एकतेच्या विरुद्ध आणि अखंडतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध होता. कलम 370 जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देते.

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 1947 मध्ये पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला हक्क विधेयक फेटाळल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाची कल्पना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्यानंतर 1912 मध्ये राज्यांची निर्मिती झाली.

8. 1942 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या सत्रात आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास 14 तासांवरून 8 तास केले.

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935-36 मध्ये ‘वेटिंग फॉर अ व्हिसाचे’ नावाचे 20 पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.

10. आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हस्तलिखित पूर्ण केले. आंबेडकरांना मधुमेहाचा गंभीर आजार होता. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button