ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखतच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू


नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार एका कठड्याला जाऊन धडकली आणि पलटी झाली. विजय मंगल पाटील असे 57 वर्षीय मयत चालकाचे नाव आहे. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचावकार्य सुरु केले. चालकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.पुण्याला फिरायला चालले होते पाटील कुटुंब

मुंबईतील कांजूरमार्ग येथे राहणारे विजय मंगल पाटील हे आपल्या कुटुंबासोबत आज मुंबईहून पुण्याला फिरण्यासाठी चालले होते. यावेळी गाडीत विजय पाटील, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले उपस्थित होते.

खोपोलीजवळ कारचे नियंत्रण सुटले अन्…

मुंबई-पुणे एक्प्रेसवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार एका कठड्याला जाऊन धडकली आणि पलटी झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

चालकाचा जागीच मृत्यू, पत्नी आणि मुले किरकोळ जखमी

कारमधील पत्नी आणि दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखतच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेच्या पथकातील विजय भोसले आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

संस्थेच्या सदस्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चालकाचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button