नऊ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यामधून एक क्रृर घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेचा जागीच मृत्यू व्हावा, यासाठी तिच्या डोक्यावर विटांनी मारहाण केल्याचंही तपासात पुढे आलं आहे.
खुनाआधी पीडितेवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

“पीडिता नायक समाजातील होती. ती मंगळवारपासून बेपत्ता होती. याबाबत तपास केला असता पीडित मुलगी एका व्यक्तीसोबत आढळून आली होती. या व्यक्तीने तिच्यासाठी चिप्स खरेदी केले होते. तिला आमिष दाखवून आरोपीने तिचे अपहरण केले”, अशी माहिती पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी दिली आहे.

“प्रथमदर्शनी आरोपीने कपड्याने गळा आवळून मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विटेने तिला मारहाण करण्यात आली. पीडितेचा मृतदेह तिच्या घरापासून दीड किमी अंतरावर आढळून आला आहे. यावरून आरोपी तरुणीच्या ओळखीचा असावा, असे स्पष्ट झाले आहे. तिचा लैंगिक छळ झाला की नाही, याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून होईल”, असे शर्मा यांनी सांगितले आहे. घटनास्थळावर श्वानांच्या मदतीने तपास केला जात आहे.

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण.”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव

पीडितेचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. पीडिता त्यांची एकुलती एक मुलगी होती. ती बेपत्ता झाल्यापासून कुटुंबियांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. अखेर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला.