पुणे

तरुणाने विवाहितेला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले


फेसबुक या सोशल मीडियावरून एका तरुणाशी झालेली ओळख एका विवाहित महिलेला चांगलीच महागात पडली.या ओळखीतून तरुणाने विवाहितेला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकाराचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला.अतुल अशोक इंदलकर (वय 25, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी यांची जानेवारी 2022 मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळखीतून दोघांची मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला भेटण्यासाठी बोलावले आणि हांडेवाडी परिसरातील एका लॉजवर घेऊन जात त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान आरोपीने फिर्यादी यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो देखील काढून घेतले होते.

त्यानंतर हेच फोटो फिर्यादी यांच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देऊन वारंवार भेटण्यासाठी बोलावले आणि हांडेवाडी येथील लॉजवर आणि फिर्यादी यांच्या घरी त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ देखील केल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button