
अखेर ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे उपआयुक्तांचे जिल्हाधिका-यांना आदेश ;सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्धिमाध्यमांच्या पाठपुराव्याचे यश ,आमदारांची लक्षवेधी – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : गोरख मोरे बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्धीमाध्यमांच्या निरंतर पाठपुराव्यानंतर अखेर उपआयुक्त (पुरवठा)औरंगाबाद वामन कदम यांनी बीड जिल्हाधिका-यांना थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला नाही म्हणून तत्कालीन प्रभारी सहाय्यक जिल्हा पुरवठा आधिकारी एस. के.मंदे यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून जिल्हापुरवठा आधिका-यांनी कारवाई केली नाही म्हणून त्यांचाही खुलासा मागविण्यात आला आहे.
१४ निवेदने, ७ आंदोलने आणि उपआयुक्त वामन कदम यांनी ३ वेळा आदेशाची अवमानना केल्याबद्दल तक्रारीनंतर कारवाई :-डाॅ.गणेश ढवळे
______
बीड जिल्हा पुरवठा विभागातुन रेशनकार्ड गायब प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर ३ वेळा उपआयुक्त (पुरवठा) औरंगाबाद वामन कदम यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई न केल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड व जिल्हापुरवठा आधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकारी बीड यांनी अहवाल पाठवला होता पाठपुरावा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, आबेद सय्यद, शेख शाहनवाज, डाॅ.संजय तांदळे, संदिप जाधव, उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे, शिवशाहु ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, आदिंनी आंदोलन करून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्री, प्रधान सचिव, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन सादर केले होते.एकंदरितच १४ निवेदने, ७ आंदोलने व विभागीय आयुक्तानी ३ वेळा आदेश देऊन सुद्धा कारवाई न केल्याबद्दल त्यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीनंतर व प्रसिद्धी माध्यमांनी वारंवार ठळक प्रसिद्ध दिल्यामुळे अखेर गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघाले.
आ.संदिप क्षीरसागर यांची हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी
____
बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणात बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विभागीय चौकशी केल्यानंतर कारवाई करणार असल्याचे उत्तरादाखल सांगितले होते.