देश-विदेश

एका जापनीज तरूणीने भारतीय तरूणासोबत लग्न


देशात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनके तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. या लग्नाबाबत अनेक किस्सेही समोर येत आहेत. त्याता आता एका लग्नाची अजब गजब गोष्ट समोर आली आहे.
एका जापनीज तरूणीने (Japanes bride) भारतीय तरूणासोबत (Indian groom) लग्न केल्याची घटना समोर आली आहे. दोघांनी हिंदू रितीरीवाजानुसार (Hindu Rituals) हे लग्न केले आहे. या लग्नाची सोशल मीडिय़ावर एकच चर्चा आहे.



हे ही वाचा : बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ

हिंदू रितीरिवाजानुसार लग्न

जपानची तरूणी मसाको (Japanes bride) भारतीय तरूण अजित त्रिपाठी (Indian groom) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. मसाको आपल्या कुटूंबियांसोबत भारतात आली होती.हा संपूर्ण लग्न सोहळा (wedding ceremony) हिंदू रितीरिवाजानुसार (Hindu Rituals) पार पडला. या लग्नसोहळ्यात नवरा-नवरीकडच्या कुटूंबियांनी देसी स्टाईलमध्ये नृत्य केले होते. या लग्नादरम्यान भारतीय संस्कृती पाहून वधूचे नातेवाईक खूपच भावूक झाले होते.

अशी सुरु झाली Love Story

या लग्नाबाबत नवरा-नवरी म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले होते. दोघांना एकमेकांच बोलण, वागण एकूणच वर्तन आवडत होते. तसेच अजितकडून भारतीय संस्कृती (Indian Culture) जाणून घेतल्यानंतर मसाकोही खूप प्रभावित झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

 

कुटूंबियांकडून होकार मिळवण्याचा मोठा संघर्ष

दोन्ही प्रेमीयुगलाची (Love story) मन जुळली होती. मात्र कुटूंबियांचा मोठा अडसर होता. त्यामुळे त्यांना लग्नासाठी तयार करणे खुपच अवघड होते.दोघांच्या संस्कृती,भाषा, खाण-पाण, देश सर्वच वेगळे होते. त्यामुळे जोडप्याला लग्नासाठी जवळपास वर्षभर संघर्ष करावा लागला. मात्र दोघांनीही हार मानली नाही.

अजितला कुटुंबातील सर्व सदस्यांसह आई-वडील आणि नातेवाईकांना या नात्यासाठी होकार मिळवायचा. त्याचवेळी मसाकोसाठी ही तिची आई शशिको आणि वडील नोरी फुमी यांचे मन वळवणे खुपच आव्हानात्मक होते.मात्र शेवटी दोघांनीही घरच्यांना या लग्नासाठी (Marriage) राजी केले. अजितच्या कुटुंबातील लोकांनीही या लग्नाला संमती दिली. आणि अजितच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार मसाकोच्या कुटुंबीयांनीही भारतीय संस्कृतीनुसार हिंदू रितीरिवाजांनुसार (Hindu Rituals) लग्न करण्यास होकार दिला होता.

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील डुबौलिया भागातील देदिहा गावातील रहिवासी शेतकरी राजेंद्र त्रिपाठी यांचा मोठा मुलगा अजित त्रिपाठी याने गावातील सरकारी शाळेतून प्राथमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि मध्यंतरीचे शिक्षण अयोध्येतून केले. त्यानंतर पश्चिम बंगाल दुर्गापूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक शिकण्यासाठी गेले. जिथे 2008 ते 2012 पर्यंत 4 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर 2014 मध्ये तो जपानला गेला होता. जपानमधील टोकियो येथील हिकारी तुलसेन कंपनीत सुमारे 8 वर्षे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून त्यांनी काम केले. येथेच त्यांचे मसाको सोबत प्रेम जुळले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

कोण आहे मसोको ?

मासाकोच्या आईचे नाव शशिको आहे, तर वडिलांचे नाव नोरी फुमी आहे. मासाको ही अजितच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. दोन वर्षांपूर्वी अजित त्रिपाठी आणि मसाकोची भेट झाली होती.

 

लग्नबंधनात अडकले

अजितच्या कुटूंबियांची हिंदू रितीरीवाजानुसार (Hindu Rituals) लग्न व्हावं अशी इच्छा होती. या इच्छेचा मान ठेवत मसाको जपानवरून कुटूंबियांसोबत मोठा प्रवास करत भारतात आली. येथे देदिहा गावात दोघांचा हिंदू रितीरीवाजानुसार लग्न सोहळा पार पडला. या लग्नाकडे केवळ दोन ह्रदये जोडून नाही तर दोन देशांचे नाते जोडूनही पाहिले जात आहे.

दरम्यान या अनोख्या लग्नाची (wedding Ceremony) संपुर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर रंगली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button