आरोपीस पकडन्यास गेलेल्या परंडा पोलिस पथकावर प्राणधातक हल्ला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

आरोपीस पकडन्यास गेलेल्या परंडा पोलिस पथकावर प्राणधातक हल्ला

डोळ्यात चटणी टाकुन केली मारहान रात्री १२ वाजे पर्यंत चालू होता थरार

परंडा : ( सुरेश बागडे ) आरोपीस पकडन्यास गेलेल्या परंडा पोलिस पथकावर डोळ्यात चटणी टाकुन काठया कुराडीने प्राणघातक हल्ला करन्यात आला असून या मध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षक ससाने यांच्या सह पोलिस कर्मचारी जखमी झाले हि घटना दि ४ एप्रील रोजी परंडा शहरापासून ४ की .मी अंतरावर कुर्डवाडी रोड लगतच्या पाटील वस्तीवर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली .

या बाबत आधिक माहिती अशी की

औंदुंबर प्रकाश पाटील यांना शेतीच्या वादातून यातील आरोपी
कृष्णा उमाकांत पाटील , उमाकांत पाटील , रामराजे उमाकांत पाटील , पल्लवी उमाकांत पाटील मुकुंद उमाकांत पाटील , गोविंद उमाकांत पाटील यांनी दि ४ रोजी कोयता, दगड काठीने मारहान करून जखमी केले होते या प्रकरणी परंडा पोलिसात सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला होता

तर राहुल भगवान पाटील यांच्या शेतातील उसाच्या कारना वरून यातील आरोपीने १६ मार्च रोजी मारहान केल्याने उस चारीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी विरूध्द अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी दिली आहे .

या गुन्हातील आरोपीना अटक करन्यासाठी परंडा पोलिसांचे पथक रात्री पाटील वस्तीवर गेले असता ४ ते ५ आरोपींनी पोलिस पथकावर हल्ला केला.

डोळ्यात चटणी टाकल्याने पोलिस पथकाला आरोपीना अटक करता आली नाही हा थरार रात्री १२ ते साडेबारा वाजे पर्यंत सुरू होता .

पोलिस पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच शेकडो लोकांनी वस्तीकडे धाव घेतली

पोलिस पथकावर हल्ला झाल्याने , दुसरे पोलिस व होमगार्ड यांचे पथक घटना स्थळी पोचले व जखमी सहाय्यक पोलीस निरिक्षक ससाने व कर्मचाऱ्यांना उपचारा साठी उप जिल्हा रुग्णालया दाखल केले .

यावेळी आरपीआयचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे , माजी उप नगर अध्यक्ष ईस्माईल कुरेशी , आदिंनी ससाने यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपुस केली .

यातील आरोपीनी पत्र्याच्या शेडचे दरवाजा आतून बंद केल्याने आरोपीना अटक करता आली नाही सहा आरोपी पैकी कृष्णा पाटील , व पल्लवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

बाकीचे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन शेडच्या मागील दरवाज्यातुन रात्री पसार झाले .

यातील आरोपींनी अटक टाळन्या साठी स्वतावर ब्लेडने वार करून घेतले असल्याचे समजते .

पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी रात्री घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली .

या प्रकरणी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे .