पाटोदा-चुंबळी गाव पाणंद रस्त्याच्या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्ताच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पाटोदा-चुंबळी गाव पाणंद रस्त्याच्या मोजणीसाठी पोलीस बंदोबस्ताच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
पाटोदा-चुंबळी गाव पाणंद रस्ता (सर्व्हे नंबर ७४१,७१६,८७७, ७४०,७४२,७३८ अंतर्गत) मोजणी दरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यास उपविभागीय आधिकारी पाटोदा यांनी आदेश देऊन सुद्धा तहसिल व पोलीस प्रशासनाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ होत असून मोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी तहसिल व पोलीस प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन मोजणीदरम्यान पोलीस बंदोबस्त देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.११ नोव्हेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी एकदिवसीय लाक्षणिक आक्रोश आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात तौसिफ हमीद शेख,अनिकेत राख,ताहेर हसन चाऊस,शेख शोएब,अमोल नाईकनवरे,दादासाहेब राख,शाफेज शेख,मोहम्मद चाऊस,शेख जुनेद,शेख मोसीन हमीद ,राहुल कवठेकर आदि. सहभागी असुन निवेदन उपविभागीय आधिकारी प्रमोद कुदळे यांना निवेदन देण्यात आले.

. सविस्तर
___
तहसिलदार पाटोदा यांच्या आदेशान्वये पाटोदा ते चुंबळी गाव पाणंद रस्त्याची मोजणी दि.२० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली होती. नमुद क्षेत्र मोठे असल्यामुळे मोजणी पुर्ण होऊ शकली नाही त्यामुळेच उप अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय पाटोदा यांनी उर्वरीत मोजणी दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी तारीख दिलेली आहे. तसे पत्रान्वये उपविभागीय व तहसिल कार्यालय पाटोदा यांना कळवण्यात आले आहे. दि.२० ऑक्टोबर २०२२ रोजी मोजणीदरम्यान सदर पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी गर्दी जमा करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी मोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच दि.०७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या उपविभागीय आधिकारी यांच्या आदेशान्वये तहसिल व पोलीस प्रशासन पाटोदा यांना आदेशीत करण्यात आले आहे. मात्र या संदर्भात तहसिल व पोलीस प्रशासनाकडून कोणतेही पत्रक काढण्यात आले नसुन या संदर्भात तहसिलदार यांना निवेदन धारकांनी समक्ष भेटुन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून एकंदरीतच पोलीस बंदोबस्त देण्याबाबत उदासिनता दिसुन आली असून दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी मोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी तहसिल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांचीच असेल याची गंभीर नोंद घेऊन पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !