पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या त्रासामुळे ट्रेनसमोर उडी मारून सुसाईड

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राजस्थानच्या भिलवाडा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत खुलासा झाल्यानंतर त्रस्त झालेल्या पतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून होणाऱ्या त्रासामुळे ४२ वर्षीय कमल कलवानीने मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून जीव दिला.
सुसाईड करण्यापूर्वी पतीने एक व्हिडिओही बनवला होता. ज्यात पत्नीच्या अफेअरचा उल्लेख केला होता.

युवकाने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडवर छळल्याचा आरोप केला. राजस्थानातील भिलवाडा येथील ही घटना आहे. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. मंगळवारी रात्री एका युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. मृतकाच्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आले.

प्रकरणात अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, मृत व्यक्तीच्या भावाच्या फिर्यादीवरून खुनाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचवेळी, पोलिसांना मृताच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ देखील सापडला आहे, ज्यामध्ये मृताने पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे विचलित झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं कारण सांगितलं.

तरुणाने व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, माझ्या पत्नीचे अफेअर आहे आणि मी तिला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडले, त्यानंतर मला सतत धमक्या येत आहेत. पत्नीने देशातील कायदा महिलांच्या बाजूने आहे असं सांगत तू काहीही करू शकत नाही, असं म्हटलं. तेव्हापासून तिचा प्रियकर आणि कुटुंबीय मला सतत धमक्या देत आहेत. त्याचबरोबर पत्नीने घरात भांडण आणि मारहाण केल्याचा आरोपही मृत युवकाने केला आहे.

मृत कमल आणि त्याच्या पत्नीचा प्रियकर या दोघांत ७ ऑक्टोबर रोजी वाद झाला होता, त्यानंतर दोघांमध्ये समझोता झाला होता. मात्र पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी मृत तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. परंतु त्यावर पुढे काही झाले नाही. त्यामुळे हे टोकाचं पाऊल तरुणाने उचललं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !