काही वेळात तो तरुण चक्क तिरडीवर उठून बसला सत्य काय?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चान्नी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश महाजन यांना याप्रकरणी संशय आला आणि त्यांनी गावात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रश्न उपस्थित करताच प्रशांत आणि त्याच्या घरच्यांकडे याची उत्तर नव्हती. चान्नी पोलिसांनी प्रशांत आणि त्याच्या घरच्यांसह बाबाला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यांना डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केलं याचा पुरावा मागितला. ते पुरावा सादर करू शकले नाहीत. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अकोला : पातुर तालुक्यातील विवरा येथील एक २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमीत नेत असताना एका मांत्रिकाने त्याला देवीजवळ नेले व तेथे काही वेळात तो तरुण चक्क तिरडीवर उठून बसल्याची धक्कादायक घटना बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री.
दरम्यान, हा सर्व प्रकार बनाव असल्याच्या संशयावरून चान्नी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

विवरा गावातील प्रशांत मेसरे या २५ वर्षीय तरुण अकोला पोलिस दलातील चान्नी पोलिसांत कार्यरत आहे. प्रशांत गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथे त्याच्यावर उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला अंत्यविधीसाठी अकोला जिल्ह्यातील विवरा गावात आणले. काल रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यविधीची करण्याची तयारी सुरु झाली. प्रशांतला तिरडीवर बांधण्यात आलेत. गावकऱ्यांसह नातेवाईक त्याला घेवून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाले.

रस्त्याच्या वाटेतच एक तांत्रिक महाराज आडवा आला आणि म्हणाला “मी प्रशांतला जिवंत करतोय. त्याला घेवून चला”, त्यानंतर तो महाराज प्रशांतला घेऊन एका खोलीमध्ये गेला. हे पाहण्यासाठी हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, काही कालावधीनंतर प्रशांत आणि महाराज दोघेही रुमच्या बाहेर आले. पाहतो तर काय, प्रशांत जिवंत झाला. हे पाहून उपस्थित असलेल्या अनेकांना धक्का बसला. तांत्रिक महाराजने एका खोलीमध्ये पूजा वगैरे करून त्याला जिवंत केल्याचा दावा केला. याची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर पोलिसांनी प्रशांतसह महाराजाची चौकशी सुरू केली. दरम्यान गावातील पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक महाराज आणि प्रशांत दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. प्रशांतने मृत्यूचं सर्व बनाव केला असल्याचे लक्षात आले आहे. प्रशांतने हा मृत्यूचा कट का रचला? हा तांत्रिक महाराज नेमका कोण आहे? या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. तांत्रिक महाराज हा १८ वर्षाचा असून मध्य प्रदेश मधील रहिवासी असल्याचा सांगण्यात येत आहे.