पत्नीच्या सुखासाठी पतीने चक्क तिचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


श्रवण आणि पूजाला लग्नानंतर चार मुलं झाली, तर दुसरीकडे पूजा आणि छोटू हे रिलेशनशिपमध्ये होते. हळुहळू दोघांनीही हे प्रकरण पुढे नेण्याचे मान्य केले आणि जेव्हा पूजाचा पती श्रवणला याची माहिती मिळाली तेव्हा त्याची प्रतिक्रिया धक्कादायक होती. गावच्या कोर्टात कागदोपत्री सादर करत पती श्रावणनं पत्नीला प्रियकरासह पळवून लावले. या घटनेबद्दल लोकांना आश्चर्य वाटले आहे.

बिहारमधील भागलपूरमध्ये चार मुलांच्या आईला प्रेमाचं इतकं वेड लागलं की तिच्या हट्टापुढे पतीला झुकावे लागले. मात्र, या प्रकरणात ग्रामस्थ न्यायालयानं हस्तक्षेप करून धक्कादायक निर्णय दिला.
भागलपूरच्या सुल्तानगंजमधील गनगनिया गावात पत्नीच्या सुखासाठी पतीने चक्क तिचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. गनगनिया येथील ग्राम न्यायालयात हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पती श्रवणनं पत्नी पूजाचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले.

घटनेची माहिती मिळताच गावातील लोक मोठ्या संख्येनं घराजवळ जमा झाले. असे सांगितले जात आहे की 2012 मध्ये श्रवणनं बांका येथील फुल्लीडुमर येथील पूजासोबत लग्न केलं. त्यानंतर पूजा तिच्या सासरच्या घरी आली आणि इथे तिची भेट छोटूशी झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.